दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
राज्यात कोरोना व्हायरस आल्यामुळे राज्यातील मंदिरे मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती ती दिवाळीच्या पाडव्याला चालू करण्यात आली आहेत त्यातील सिद्धटेक मंदिर ही भाविकांना साठी चालू करण्यात आले असून फेब्रुवारी महिन्यात जी संकष्टी चतुर्थी झाल्यानंतर आज आठ महिन्यानंतर पहिली चतुर्थी असल्यामुळे कमी प्रमाणत का व्हायना भाविकांनी हजेरी लावली होती नेहमी प्रमाणे संकष्टी चतुर्थी निमित्ताने पहाटे चार वाजल्या पासुन सिद्धिविनायकचे भाविकांनी दर्शन घेतले दर्शनासाठी दौंड ,कर्जत ,श्रीगोंदा, तालुक्यातुन कोणी चालत तर कोणी वाहनांनमध्ये येऊन दर्शन घेतले सिध्दटेकला सकाळी पासून भाविकांनी कमी प्रमाणात गर्दी केली होती आज सकाळी थंडी वाढल्यामुळे थोडी गर्दी कमी पहावयास मिळाली होती त्यात अष्टविनायक महा मार्गाच्या रस्तेच काम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुरळा पाहवयास मिळत होता श्री च्या मुर्तीला पहाटे स्नान घालुन अभिषेक करण्यात आला व मंदीराचे प्रवेशद्वार दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले होते .दुपारी बारा वाजता श्री ना नैवद्य दाखवण्यात आला त्यानंतर चिंचवड देवस्थान कडुन आलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला तसेच भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती अशी माहिती पिंपरी चिंचवड देवस्थान यांच्या कडून मिळाली