सोमेश्वरनगर प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारवाढीसाठी सर्व प्रशासकीय मंजुरी घेवुन जी विस्तारवाढ खरोखरच सभासदांसाठी गरजेची आहे त्या विस्तारवाढीसाठीस कृती समिती का विरोध करत आहे , हे वेगळे सांगण्याची गरज नाही ते सभासदांमध्ये सर्वश्रुत असल्याचे सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, राज्यातील साखर कारखान्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी जी शिखर संस्था समजली जाते, ज्याचे अध्यक्ष देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार आहेत अशा वसंतदादा शुगर इन्स्टीट्युड या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या डिपीआर प्रमाणे आपण साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी घेवुन सोमेश्वरची विस्तारवाढ करीत असताना फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व स्टंटबाजीसाठी विस्तारवाढीस व कारखान्याच्या अन्य विकासात अडथळा निर्माण करायचा या खोडकर सवयी कृती समितीच्या ठरलेल्या आहेत. परंतु त्यांच्या या खोडकर वागण्याने सुज्ञ सभासदांची कोणतीच दिशाभुल होणार नाही. कृती समितीचे नेते एकीकडे विस्तारवाढीसाठी ४५ कोटी खर्च अपेक्षित होता व त्याची मंजुरी घेतल्याचे सांगत आहेत परंतु कृती समितीच्या या तज्ञ नेत्यांना ही बाब जाणुनबुजुन लक्षात येत नाही की त्यांना येवु देयची नाही, की विस्तारवाढीसाठी आपली मंजुरी जी घेतली गेली ती सन २०१८ मध्ये घेतली गेली व आपला अत्ताचा डिपीआर जो व्हिएसआय या संस्थेकडुन तयार केला गेला आहे तो सन २०२० अखेर आपण तयार करुन त्यामध्ये इटीपी प्लॅट, ३ मेगावेटचा टर्बाईन व अन्य गोष्टींचा सामावेश करण्यात आला आहे.
गोष्टींमुळे व आपल्या अत्याधुनिक विस्तारवाढीमुळे या खर्चात वाढ झाली असुन या सर्व साखर आयुक्त कार्यालयही सगळ्या गोष्टींची खातरजमा करुनच यास मान्यता देते याची माहिती कदाचित कृती समितींच्या नेत्यांना नसेल नाही.
जर त्यांना याचा विरोधच करायचा होता तर ते न्यायालयातुन जावुन निकालासाठी थांबु शकले असते परंतु वृत्तपत्रात याची बातमी देवुन नक्की कृती समितीला काय साधायचे आहे हे सभासदांना चांगलेच लक्षात आले असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी म्हंटले आहे