सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायत उमेदवार/ कार्यकर्ते/ व ग्रामस्थांना सुचित करण्यात येते की, मा.जिल्हाधिकारी सो,पुणे यांनी खालीलप्रमाणे सक्त मनाई आदेश काढला आहे.
1. विजयी मिरवणूक काढणे.
2. वाहन रॅली काढणे
3. फटाके वाजवणे
4. गुलाल उधळणे
5. विना परवानगी फ्लेक्स/ बॅनर
लावणे.
वरीलप्रमाणे सक्त मनाई आदेश आहेत.
तसेच दिनांक १८/०१/२०२१ रोजी रात्रौ १०.०० वा ते दिनांक १९/०१/२०२१ रोजीचे सकाळी ०६.०० वा. पर्यंत सर्व हॉटेल,ढाबे,खानावळी, चायनीज, पान टपरी इ. सर्व आस्थापना बंद राहतील
सदर आदेशाची सर्व आस्थापना चालक मालक यांनी अंमलबजावणी करणे बंधनकारक असून या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तरी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन एपीआय श्री.सोमनाथ लांडे यांनी केले आहे.