इंदापूर प्रथिनिधी आदित्य बोराटे
इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभाराचा विजवितरण विभाग इंदापूर कार्यालयासमोर पंचनामा करून निषेध नोंदविण्यात आला.
तालुक्यातील भाजप व मित्र पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आनंदोलन केले. शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी सरकारला दिला.असुन ते म्हणाले की महाआघाडीचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. जर वीज कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचा कर्मचारी आला तर त्यांना गुलाबाचे फुल देऊन माघारी पाठविण्याचा इशारा माजी सभापती मयुरसिंह पाटील यांनी दीला.
भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या विरोधात हे आंदोलन असून जर महावितरणने वीज तोडणी मोहीम थांबली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तालुक्याचे निष्क्रिय लोकप्रतिनिधी सायरन वाजवत तालुक्यात फिरतात. राज्यमंत्र्यांनी तालुक्यातील वीज कनेक्शनची तोडणी व सक्तीची वसुली बंद करावी,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे निलेश देवकर, रिपब्लिकन पार्टीचे शिवाजी मखरे, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. कृष्णाजी यादव, पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, युवराज मस्के यांनी मनोगत व्यक्त केले.
.
यावेळी नंदकुमार सोनवणे,प्रदीप पाटील, धनंजय पाटील, अंकुश पाडुळे, रामकृष्ण मोरे गजानन जगताप, पांडूरंग (तात्या) शिंदे, मोहन दुधाळ, महेंद्रदादा रेडके, नितीन माने, माऊली बनकर, रघुनाथ राऊत, रवींद्र पाटील, किशोर पवार, कैलास कदम, मानसिंग जगताप, रामकृष्ण मोरे, सुभाष भोसले, गोरख शिंदे, माऊली बनकर, पिंटू काळे, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब पानसरे, सुभाष काळे, शरद काळे, , संदिपान कडवळे, अमोल मीसाळ, तानाजी नाईक, गोरख आदलिंग,शितलताई साबळे, जगदीश मोहिते, दादा पिसे, नितीन आरडे उपस्थित होते. यावेळी सहाय्यक अभियंता रघुनाथ गोफणे यांना निवेदन देण्यात आले.
______________________________.