सोमेश्वरनगर प्रतिनिधी l Live पुणे बारामती
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येतील समर्थ ज्ञानपीठ संचालित, उत्कर्ष आश्रमशाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षिका डॉ. करुणा माने-कोरे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी शिक्षणशास्त्र विषयातील संशोधनाबद्दल नुकतीच पी एच डी पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय "इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजविण्यासाठी विविध विषयांच्या अध्यापनाच्या परिणामाचा चिकित्सक अभ्यास" हा होता. त्यांना गारगोटी येथील आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.डी. बेलेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल समर्थ ज्ञानपीठाचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, संस्थेच्या प्राचार्या रोहिणी सावंत, रोहिदास कोरे आणि संस्थेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.