Type Here to Get Search Results !

सावता परिषदेच्या वर्धापन दिनी दत्तात्रय भरणे व यशवंत माने यांची उपस्थिती..

इंदापूर प्रतिनिधी : आदित्य बोराटे.

          निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मोहोळ तालुक्याचे आमदार व शेळगाव (ता.इंदापूर)चे सुपुत्र यशवंतराव माने यां प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सावता परिषद महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा 14 वा वर्धापन साजरा करण्यात आला. प्रथम संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांचे प्रतिमेस दत्तात्रय भरणे व यशवंतराव माने यांचे हस्ते पुष्पहार अर्पन करून वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला.

        याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व आमदार यशवंतराव माने यांचा सन्मान सावता परिषदेचे प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की सावता पराषदेचे काम राज्यात चांगले आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे हे समाजाला न्याय देण्यासाठी रात्रंदिवस झटत असुन समाजातील तळा गाळातील नागरिकापर्यंत या संघटनेची पाळेमुळे रूजली असल्याने सावता परिषदेला बळ देन्याचे काम   भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार असल्याची माहीती दत्तात्रय भरणे यांनी दीली.

        सावता परिषदेचे प्रदेश संघटक संतोष राजगुरू व त्यांचे सर्व पदाधिकारी सावता परिषदेच्या माध्यमातून माळी समाज व ओबीसीच्या मागण्यांसाठी कायम झटत आहेत.त्यांचे कार्यही चांगले असल्याने भविष्यात सावता परिषदेचे सामाजिक व राजकीय महत्व वाढणार असल्याचे मत मोहोळचे आमदार यशवंतराव माने यांनी व्यक्त केले.तर यावर्षी कोरोना महामारीने सर्व जगाला हादरवुन सोडले असुन कोरोनाचा कहर थोडा कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणुन यावर्षी सावता परिषदेचा 14 वर्धापन दिन हा साधेपनाने साजरा करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी कार्यकर्त्यांना केले असल्याने यावर्षीचा वर्धापन दिन साधेपनाने साजरा करण्यात येत असल्याची माहीती प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांनी दीली.

        यावेळी राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,नगरसेवक स्वप्निल राऊत, महिला आघाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, तात्यासाहेब वडपुरे ह.भ.प कोंडीबा भोंग  , महादेव शेंडे  तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे ,युवा आघाडी तालुका ,तालुका कार्याध्यक्ष मचिंदर भोंग जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे ,राष्ट्रवादीचे नेते संदीप देवा भोंग, युवा कार्यकर्ते अजय गवळी ,सौराभ शिंदे ,काशिनाथ भोंग यांचेसह सावता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते . 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test