इंदापूर प्रतिनिधी - आदित्य बोराटे
इंदापूर तालुक्याचे नेते. दिनानाथ पर्वती मारणे यांचीच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या ‘ महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ’ निवड झाली आहे. मारणे यांच्या कामगार क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मारणे यांना भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांच्याकडून तसे नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
नियुक्तपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, गेली अनेक वर्षे संघटित, असंघटीत कामगार क्षेत्रात कार्यरत राहून, कामगार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसेच कामगार आघाडीचे मार्गदर्शक संजय केनेकर आदिंना अभिप्रेत असणारी कामगार आघाडीची ध्येये धोरणे, कामगारांच्या समस्या व संघटनेने दिलेले कार्यक्रम कामगारांच्या शाश्वत विकासासाठी राबवून देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये कामगार वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी मारणे यांच्यावर सोपवली आहे.
मारणे यांनी स्थानिक पातळीवर युनियनची उत्तमरित्या बांधणी करून कामगार वर्गात चांगले स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले असून सदस्य पदाची जबाबदारी या आधीच्या काळात यशस्वीपणे सांभाळलेली आहे. आताही ते युनियनचे सदस्य असून अजातशत्रू म्हणून त्यांची ख्याती आहे.
मारणे हयांचा कामगार क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचा मोठा नावलौकिक असून गावातील कार्यक्रम सोहळ्यात सक्रिय सहभाग असतो.
आगामी काळात कामगार आघाडीच्या माध्यमातून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मारणे यांनी सांगितले.
त्यांच्या या निवडीबद्दल उपमहापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका केशव घोळवे व प्रितिताई व्हिक्टर यांनी मारणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मारणे यांचे संपूर्ण इंदापूर तालुक्यातील पंचक्रोशीत कौतुक व अभिनंदन होत आहे.
उपस्थित सचिन वाघ, संजय हनुमंत सकुंडे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी भाजपा). अशोक वणवे ,मुबारक सय्यद,. तुळशीदास धुंडे (प्रभारी पश्चिम महाराष्ट्र),भाग्यश्री जायभाय ,निलेश बडदे ,संतोष करपे