बारामती प्रतिनिधी
दिनांक 01/01/2021 रोजीचे रात्री 10/00 वा. ते ता. 02/01/2021 रोजीचे पहाटे 05/00 वा.चे दरम्यान मौजे लोणी देवकर ता.इंदापुर जि.पुणे येथील एमआयडीसी मधील प्लॅन्ट केअर क्राॅप सायन्स कंपनी लगतचे शेडमधुन व कंपनी व्हीआरएसचे पाठीमागील शेडमधुन कोणीतरी अज्ञात चोरटयांनी कडीकोयंडा तोडून एकुण चार मोबाईल व 20,000/- रोख रक्कम असा एकुण 66,000/- चा माल चोरी करून नेला . वगैरे मजकुरची फिर्याद कृष्णात तुकाराम गव्हाणे वय 43 वर्ष रा.लोणी देवकर एमआयडीसी ता.इंदापुर जि.पुणे यांनी दिलेवरून *इंदापूर पो.स्टे. गुन्हा रजि. नंबर 5/2019 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक इंदापूर परिसरात तपास करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून आरोपी नामे रामदास ज्ञानेश्वर धोत्रे वय 34 वर्षे राहणार इंदापूर, वडार गल्ली ता.इंदापूर जि.पुणे मूळ रा.कोळेगाव ता.माळशिरस जि.सोलापूर यास इंदापूर येथून ताब्यात घेवून गुन्हयातील चोरलेला मोबाईल किं.रु.१०,०००/- चा त्याचेकडून हस्तगत केलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते सो., बारामती उपविभागीय अधिकारी श्री.नारायण शिरगावकर सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक .पद्माकर घनवट, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकव, सुभाष राऊत,
पो.ना. गुरु गायकवाड,पो.ना. अभिजित एकशिंगे,
पोहवा. काशिनाथ राजपुरे यांनी केलेली आहे.