वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदाची महत्वपूर्ण जवाबदारी माझ्यावर सोपवली असून त्या पदाचा वापर समाजाच्या सेवेसाठी करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष भैयासाहेब खाटपे यांनी व्यक्त केले.
वाल्हे ( ता.पुरंदर ) येथे भैयासाहेब खाटपे यांच्या निवडी बद्दल प्रा.सचिन दुर्गाडे मित्र परिवार तसेच महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कारास प्रतिउत्तर देताना खाटपे हे बोलत होते.
खाटपे पुढे म्हणाले जागतिक संकटामुळे सर्वसामान्य वर्गासह विद्यार्थी व्यापारी तसेच शेतकरी वर्गाला देखील विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे.मात्र आगामी काळात समाजातील विविध घटकांना जमेल तशी मदत निश्चितच करणार आहे.
याप्रसंगी प्रा.सचिन दुर्गाडे यांसह कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव चोरमले पाटील सामाजिक कार्यकर्ते संदिप नाना दाते महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प.अशोक महाराज पवार, अविनाश जाधव ,धनंजय गायकवाड, निलेश दुर्गाडे, विशाल भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.