बारामती प्रितिनीधी
कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसे दिवस वाढतच चालला असुन बारामती मध्ये कमी झालेली कोरोना पेशंटची संख्या आता मात्र दिवसेदिवस वाढतच आहे. यातच आता बारामतीमधील एका शिवसेना युवानेत्याला सुद्धा कोरोना प्रादूर्भाव झाल्याची माहीती समोर येत आहे. एकंदरीतच कोरोना संसर्गात वाढ झाल्याने योग्य ती खबरदारी घेने आवश्यक झाले असतांना काही ठीकाणी अजुनही विनाकारण लोक गर्दी करुन सोशल डीस्टंसिंग नियमांचा फज्जा उडवत आहेत. आत्ता पर्यंत बारामती मध्ये एकून आजची पेशंटसंख्या ४१ वर गेली असुन याबाबत काळजी व्यक्त करण्यात येत आहे.