Type Here to Get Search Results !

कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीला टाळे लावण्याच्या वेळ हजारो तरुणांच्या डोक्यावर बेरोजगार ची टांगती तलवार......शासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा : अध्यक्ष संजय भालेकर


वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ

गेल्या चार महिन्यांमध्ये पॅकेजिंग इंडस्ट्रीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत गेली आहे जवळपास ८० टक्‍क्‍यापर्यंत झालेल्या या दरवाढीमुळे पॅकेज इंडस्ट्रीला उतरती कळा लागली असून आता पॅकेजिंग इंडस्ट्री ला टाळे लावण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या संदर्भात केंद्र शासन व राज्य शासनाने त्वरित लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी महा उद्योजक संघाच्या वतीने करण्यात आली असून याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास महा उद्योजक संघ पॅकेजिंग इंडस्ट्री च्या सहकार्याने तर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा महा उद्योजक संघाचे अध्यक्ष संजय भालेकर यांनी तळवडे येथील आयोजित बैठकीत दिला आहे.

याबाबत माहिती देताना उद्योजक भावेश दाणी म्हणाले की, दैनंदिन जीवनात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू  सुबक पॅकेजिंग मध्ये मिळत असतात. पॅकेजिंग हे नुसते दिखाऊपणा साठी नसून आपण खरेदी केलेल्या मालाच्या सुरक्षेसाठी ही तितकेच महत्त्वाचे असते. या मुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीला उतरती कळा लागणे म्हणजेच संपूर्ण उत्पादन क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल..

सातत्याने होणार्‍या या दरवाढीमुळे घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करत असताना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
सध्या नुसत्या पुणे जिल्ह्यात सहाशे कोरोगेटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत आणि त्यावर अवलंबून हजारो कुटुंबे या सर्व बर उपासमारीची वेळ आली आहे.
अशा बिकट परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पिंपरी चिंचवड पुणे मॅन्युफॅक्चरर ग्रुप आणि महा उद्योजक महाराष्ट्र राज्य यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघाचे अध्यक्ष संजय भालेकर यांनी दिला.
यावेळी बोलताना श्रीपती एंटरप्राइजेस प्रतिक पवार म्हणाले की, ८० टक्के झालेल्या वाढीमुळे इंडस्ट्रीज बंद पडण्याची वेळ आली असून अनेकांना यामुळे बेरोजगार व्हावे लागणार आहे.
एस आर पेपरचे संजीव मिश्रा म्हणाले की, अशाप्रकारे गेल्या चाळीस वर्षात प्रथमच बिकट परिस्थिती पॅकेजिंग इंडस्ट्री व पेपर इंडस्ट्री वर येऊन ठेपली आहे याबाबत लवकरच तोडगा न निघाल्यास हे व्यवसाय बंद पडणार असून या व्यवसायावर अवलंबून असलेले जवळपास चार हजार कामगार बेरोजगार होणार आहेत ही चालू असलेली वाढ अजून किती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याचाही अंदाज वर्तविण्यात येऊ शकत नाही अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

परफेक्ट पॅकेजिंगचे बी. जी. चौधरी यावेळी बोलताना म्हणाले की, मी गेली वीस वर्षे या व्यवसायात आहे परंतु एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देण्याची पहिल्यांदाच वेळ येऊन ठेपली आहे शासनाने ताबडतोब निर्यात होणारा पेपर थांबवावा व येथील उद्योग-व्यवसायांना उभारी देण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या बैठकीस पिंपरी, चिंचवड, चिखली, तळवडे, भोसरी, चाकण, पुणे व रांजणगाव या औद्योगिक परिसरातील कोरोगेटेड मॅन्युफॅक्चरर उद्योजक अनिल भालेकर, भावेश दाणी, सुनील अगरवाल, संजीव मिश्रा, रवि सचदेव, नवीन सरोगी, स्वप्नील चौधरी, संतोष गोरे, विशाल अजमेरा, अशोक चांडक, अमित जाधव, हेमंत कुशारे, नाना आवारे, प्रतीक पवार, जगमोहन अग्रवाल आदी उद्योजक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test