सोमेश्वरनगर प्रतिनिधी.
बारामती पंचायत समितीच्या नूतन सभापती पदासाठी झालेल्या सदस्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार सभापतिपदी तालुक्यातील मुरुमच्या नीता नारायण फरांदे यांची निवड केली आहे. या वेळी निवडीची घोषणा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.
नौता फरादि यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने
पंचायत समितीच्या सभापतिपदी त्यांची बिनविरोध
निवड केल्याचे सांगितले.