सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील इंजिनियरिंग कॉलेज सोमेश्वरनगर येथे झालेल्या कार्यक्रमात सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक महेश काकडे, विशाल गायकवाड, सोमेश्वर सायन्स कॉलेजचे प्राचार्य धनंजय बनसोडे, प्रा संतोष पिंगळे, महेश बैरागी यांचे हस्ते चेकवाटप करण्यात आले
पुणे येथील फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन्स या संस्थे मार्फत दरवर्षी पुणे जिल्ह्यातील पुणे, सांगवी, मंचर, पुरंदर, व बारामती या विभागातील १० वी १२ वी पास झालेल्या हुशार व गरजू विध्यार्थ्यांना त्यांच्या फी इतकी शिष्यवृत्ती दिली जाते दरवर्षी साधारण २०० ते २५० विध्यार्थी यासाठी पात्र होतात यात विध्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती त्याचे १०-१२ वी चे गुण यांनी प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते.
यात निवड झालेल्या विध्यार्थ्यांना त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत व दरवर्षी नेमून दिलेल्या गुणांच्या अटीवर ही फी दिली जाते तसेच दर दोन महिन्यांनी या मुलांची कौशल्य विकसनाची एक कार्यशाळा पुणे येथे घेतली जाते यासाठी या मुलांना जाणे येणे साठी सुविधा सकाळचा नास्ता व जेवण फोर्ब्ज मार्शल कंपनी कडून उपलब्ध करून दिले जाते
या शिष्यवृत्ती द्वारे बारामती विभागातून आत्तापर्यंत १०२ विध्यार्थ्यांना सुमारे पाऊण कोटी रुपयेची मदत मिळाली आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन्स संस्थेचे समन्वयक राजेंद्र बालगुडे यांनी केले, कल्याणी शिंदे यांनी आभार व्यक्त केले तर बाबूलाल पडवळ यांनी सूत्रसंचालन केले