Type Here to Get Search Results !

बारामती कृषी विभागाकडून शेतकरी गटामार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला व फळे पुरवठा : कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ

Top Post Ad

बारामती कृषी विभागाकडून शेतकरी गटामार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला व फळे पुरवठा : कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ
बारामती प्रतिनिधी

कोरोनाच्या  वाढत्या संसर्गामुळे सर्व काही अर्थव्यवस्था व्यवस्था , शेतमाल असे अनेक व्यवहार कोलमडली  आहेत , त्यातच कोरोनाच्या वडत्या प्रभूर्भवामुळे शासनाने आठवडे बाजारही बंद केले आहेत. त्यामुळे ग्राहक व शेतकरी यांचा समन्वय च तुटलेला आहे.. त्यामुळे  शेतकऱ्यांच्या भाजीपाला फळे शेतातच सडून  जात आहे व याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याची दखल घेत शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचा काळजी व एक उपाययोजना म्हणून बारामती कृषी  भाजीपाला उत्पन्न विभागाकडून करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांचा माल आता थेट  ग्राहकांना पुरवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे 
    त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळणार असून ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळण्याचे समाधान मिळणार आहे . बारामतीत उद्यापासून(दि ५ )मध्यरात्री पासून  सात दिवस कडक लॉक डाऊन झाले आहे .  बहुतांशी दलाल शेतकऱ्यांकडून अल्प भावात शेतमाल ,फळे ,भाजीपाला घेऊन ते दुप्पट व फळे तिप्पट भावाने विकत आहेत , यामध्ये शेतकरी तर भरडला जातोच त्याबरोबर गग्रामीण व शहरातील नागरिकांना ही यांचा मालाला जास्तीचे  पैसे देऊन सहन करावा लागतो,सर्व सामान्य आधीच आर्थिक अडचणीत असल्याने चढ्या भावात भाजीपाला खरेदी करू शकणार नाही दुसरीकडे शेतकऱ्यांनाही कवडीमोल भावाने भाजीपाला व्यापारी दलालाने घश्यात घालावा लागत होता त्यामुळे बारामती कृषी विभाग यांनी शेतकरी गटामार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला व फळे पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले,

 तरी अशा शेतकरी गटांनी आपला भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करायचा असेल तर कृषी विभागाच्या 
कृषी पर्यवेक्षक व सहाय्याक स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.