CBSE बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचे राज्याचे संकेत…
CBSE बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचे राज्याचे संकेत…
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या (SSC HSC Exam) परीक्षांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांशी येत्या दोन दिवसात चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं,याबाबत अद्यापही निर्णय घेऊ न शकलेल्या राज्याच्या शिक्षण विभागाने बारावीच्या परीक्षेसाठीही पर्याय शोधायला हवा, अशी भूमिका केंद्रीय स्तरावरील रविवारच्या बैठकीत घेतली.
विद्यार्थ्यांचे आरोग्य सरकारची प्राथमिकता असू पालकांमध्ये परीक्षा घेण्यावरुन भीती असं म्हणत काही तांत्रिक बाबी लक्षात घेता संपूर्ण विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचंही वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह इतर केंद्रीय, आंतरराष्ट्रीय मंडळे, राज्यमंडळ यांनी दहावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर बारावीची परीक्षाही रद्द करण्याची मागणी पालकांनी केली. त्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावर रविवारी बैठक घेण्यात आली. त्यात राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी भूमिका मांडली. ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे सूत्र केंद्रीय पातळीवर समान असावे, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन मंडळाच्या परीक्षेव्यतिरिक्त इतर मार्गानी करणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे,’ असे गायकवाड म्हणाल्या.