नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी मध्ये संशोधनासाठी निवड.
पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी गुवाहाटी येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे." माॅडर्न इंडीयन डिप्लोमॅटीक अँन्ड इंटरनॅशनल हिस्टरी" यामध्ये ते संशोधन करणार आहेत. यामुळे नवनाथ यांचे सर्वञ कौतुक होत आहे.
फडतरे यांनी साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. इंडीयन इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलाॅजी (आय.आय.टी ) गुवाहाटी, आसाम मधुन पदव्युत्तर पदवी पुर्ण केली आहे,तसेच यापुर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयु) दिल्ली मधुन "मास्टर आॅफ फिलाॅसाॅफी इन चायनीज स्टडीज" निवड झाली आहे. मराठी माध्यमांतुन शिक्षण घेवुनही आय.आय.टी.प्रवेश , नेट , गेट आणि आता भारतातील नामांकीत असणार्या आय.आय.टी मध्ये संशोधनासाठी निवड झाली आहे. विविध राष्ट्रीय परिक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवुन नवनाथ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. पुरंदर मधील बोपगाव या छोट्याशा गावातील , सर्वसामान्य कुटुंबातील नवनाथ यांचा शैक्षणिक आलेख आणि गरुडक्षेप सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे.