प्राध्यापक पाटील सर यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा - आरटीओ राजेंद्र केसकर
प्राध्यापक दुर्योधन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत कारुंडे तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बारामती येथील आरटीओ केसकर साहेब हे होते. त्यावेळी बोलताना पुढे म्हणाले की प्राध्यापक दुर्योधन पाटील सर यांचा आदर्श घेत वाढदिवस सामाजिक उपक्रमाने राबवावेत असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यामध्ये बारामतीचे आरटीओ केसकर साहेब, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी बी कोळेकर सर, फलटण पोलिस स्टेशनचे एपीआय कदम साहेब, महावितरण नातेपुते चे रुपनवर साहेब, कारुंडे गावचे माजी सरपंच हनुमंत पाटील, तसेच माजी उपसरपंच जगन्नाथ लोंढे, पोलीस पाटील विकास रुपनवर, संध्याराणी काळे मॅडम, फडतरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अर्जुन दादा रुपनवर, धर्मपुरी चे केंद्रप्रमुख दत्तात्रय झेंडे, फडतरी चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर रुपनवर, पिंपरी कोथळे गावचे सेक्रेटरी बापूराव पाटील , सोसायटी सदस्य पांडुरंग रुपनवर, चेअरमन राजेंद्र पाटील, पोपट पाटील, सागर पाटील, बापू कचरे, विकास रुपनवर, नितीन वायाळ, तसेच कारुंडे व धर्मपुरी चे अनेक नागरिक उपस्थित होते. पाटील सरांच्या वाढदिवसानिमित्त अनेक शाळांवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम चालू आहेत. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला.