बारामती बसस्थानकाचे तात्पुरत्या स्वरूपात स्थालांतर : विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड
बारामती प्रतिनिधी
बारामतीतील बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपात तेथील बस स्थानकाच्या पाठीमागे रविवार दि १३ पासून
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती बस स्थानकाची नवीन सुसज्ज, अत्याधुनिक अशी ईमारतीचे काम लवकर सुरु होत आहे. सदरील रविवार दि १३ पासून कामामुळे बारामती बस स्थानक
तात्पुरत्या स्वरूपात बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे.सदरील तात्पुरत्या स्थानकात प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था, कंट्रोल, ध्वनीक्षेपन यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा, टॉयलेट बाथस्म ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पूर्वीप्रमाणे सर्व बसेस तात्पुरत्या आगारातून सुटणार आहेत. दिनांक 13 जून 2021 पासून तात्पुरते बस स्थानक सुरू करण्यात आलेले आहे.
तरी राज्य परिवहन च्या सर्व सन्माननीय प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रमाकांतज गायकवाड(विभाग नियंत्रक रा.प.पुणे) व अमोल गोंजारी, (आगार व्यवस्थापक) तर बारामती आगार यांनी केले आहे.