बारामती शहर हददीतुन बोकड/शेळी चोरांना केली अटक
बारामती प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस स्टेशन हददीतुन दि.२०/६/२०२१ रोजी पिपळी लिमटेक येथुन फिर्यादी यांचे राहते घरासमोरील गोटयातुन एक बोकड व शेळी चोरी केल्याची तकार दाखल असुन त्याअनुशंगाने दाखल गुहयातील आरोपी चा शोध घेणेकामी मा.पोलीस निरीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर परीसरात
गुप्त बातमीदारामार्फत मिळाली माहिती वरून सदर आरोपी हे पिंपळी लिमटेक चौकात आले असलेचे
समजले वरून तात्काळ सापळा रचुन त्यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांनी आपले नाव १)अक्षय दादा बोरकर २)अशोक विश्वास गंगावणे रा.दोघे विठठलवाडी गुनवडी ता बारामती जि पुणे असे सांगितले त्यांचेकडे अधिक विचारपुस चौकशी केली असता त्यांनी लिमटेक येथुन एक शेळी व बोकड चोरी केलेची कबुली दिली सदर आरोपी पुढील कारवाईसाठी बारामती शहर पोलीस स्टेशनला घेवुन आलो आहे.पुढील
कारवाई करत आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख सो,मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री.
मिलींद मोहीते सो, यांचे मार्गदर्शनाखाली मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर साो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मयुर भुजबळ सो, पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे सो यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,सहायक फौजदार शिवाजी निकम,पोलीस नाईक रूपेश साळुके,पो.कॉ.अजित राउत तुषार चव्हाण,अकबर शेख,सुहास लाटणे,दशरथ इंगोले,होमगार्ड संदीप थोरात यांनी केली.