बहुजन सेवा संघ करंजे यांच्यावतीने मंगेश शेंडकर यांना आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मिळल्याबद्दल सत्कार.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपूल-शेंडकरवाडी येथील मंगेशकुमार राजकुमार शेंडकर या संशोधक विद्यार्थ्यास "व्हीडीगुड प्रोफेशनल असोसिएशन" या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित संस्थेकडून 'आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ पुरस्कार-२०२१' पुरस्कार जाहीर झाला असून. कोईमतूर येथे १० व ११ सप्टेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तो दिला जाणार आहे.
बोलताना शेंडकर यांनी मिळालेल्या पुरस्कार पर्यंतचा प्रवास हा संघातील युवा सदस्यांना माहिती व त्याच्या ज्ञानात भर पडावी कुठेतरी त्यांच्या चालू शैक्षणिक जीवनात त्याचा उपयोग होणार असल्याने त्यांना याचा आनंद झाला असून त्याचे आभार ही मानले
तसेच शेंडकर यांना मिळालेल्या यशा बद्दल बहुजन सेवा संघ करंजे यांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,
या प्रसंगी बहुजन सेवा संघ अध्यक्ष पोपट हुंंबरे यांच्या सूचनेनुसार संघाचे कार्याध्यक्ष व पत्रकार विनोद गोलांडे, खजिनदार किशोर हुंबरे, सदस्य प्रशांत जाधव, नितीन शेंडकर, संतोष भिसे, अभिनय हुंबरे,करण हुंबरे,आदित्य हुंबरे यांनी एकत्रित मंगेश शेंडकर यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करत त्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.