वाकी गावचे प्रमोद महादेव गायकवाड यांची पुणे शहर पोलिस दलात हवालदार पदी पदोन्नती
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाकी गावचे सुपुत्र प्रमोद महादेव गायकवाड यांची पुणे शहर पोलिस दलात हवालदार पदी
पदोन्नती नुकतीच करण्यात आली , गायकवाड हे
पुणे शहर पोलीस दलामध्ये सन 2005 रोजी भरती झाले त्यानंतर आत्तापर्यंत पोलीस खात्यामध्ये एकूण 18 वर्ष उत्तमरीत्या काम करत वानवडी गुन्हे शाखा लष्कर पोलिस स्टेशन चांगली कामगिरी बजावत गायकवाड यांनी पोलीस खात्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 150 बक्षीस मिळाली आहेत.
या निवडी बद्दल तालुक्यासह वाकी ग्रामस्थांनी गायकवाड यांचे कौतुक करत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.