देऊळगाव येथे कोविड पेशंटची हेळसांड
देऊळगाव राजे प्रतिनिधी
प्रचंड मागणी नंतर अखेर गेल्या दीड महिण्यापासून देऊळगाव राजे येथे सिद्धेश्वर विध्यालयात परिसरातील कोविड पेशंट ची सोय व्हावी या उद्देशाने कोविड सेंटर सुरू करण्यात आले खरे ,पण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी पूर्ण क्षमतेने स्टाप अजून तरी मिळालेला नाही, आज रोजी या कोविड सेंटर ला ४१जण उपचार घेत असून या ठिकाणी दोन वार्ड बॉय नियुक्ति असताना आज रोजी फक्त एक वार्ड बॉय आणि अवघ्या तीन सिस्टर सेवा बजावीत आहेत, या ठिकाणी मेडिसिन सुद्धा पूर्ण क्षमतेने उपलब्ध होत नाही हे प्रशासनाचे मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल,विशेष म्हणजे जो एक वार्ड बॉय आहे तो सध्या दिवस रात्र सेवा बजावीत आहे, उलट स्वामी चिंचोली येथे कोविड सेंटर ला ३८पेशंट उपचार घेत असून या ठिकाणी तब्बल ६वार्ड बॉय नियुक्त असल्याची माहिती मिळाली,भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर म्हणाले की तालुका आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी करून देखील आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणीही काही दखल घेत नाहीत जर या पुढे देखील असाच दुजाभाव केला तर पुढील काळात लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल आणि यासाठी सर्वस्वी तालुका आरोग्य विभाग जबाबदार राहिल, तरी तालुका आरोग्य विभागाने या कामी त्वरित लक्ष घालून आवश्यक स्टाप आणि मेडिसिन त्वरित उपलब्ध करुण द्यावे अशी मागणी गिरमकर यांनी केली आहे,याबाबद तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयन्त केला पण माझे सध्या महत्वाचे काम चालू असून मि तुमच्याची नंतर बोलते असे म्हणून फोन ठेऊन दिला.