Type Here to Get Search Results !

महागाई रोखण्यास केंद्र सरकार अपयशी – प्रा.दुर्गाडे

महागाई रोखण्यास केंद्र सरकार अपयशी – प्रा.दुर्गाडे
वाल्हे प्रतिनिधी 

कोरोनाच्या महामारीत पेट्रोल डीझेल यांसह खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे .मात्र देशाच्या नेतृत्वातच खोट असल्याने महागाई रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा घणाघाती आरोप बारामती लोकसभा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष प्रा.सचिन दुर्गाडे यांनी व्यक्त केला .
वाल्हे येथील शहीद शंकर चौकात आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.सचिन दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली निरा कोळविहिरे गटाच्या वतीने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाईच्या विरोधात आंदोलन करून केंद्र सरकारचा जाहिर निषेध व्यक्त केला .यावेळी आपल्या भाषणातून मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार तोफ डागताना प्रा.दुर्गाडे हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले सध्याच्या परिस्थितीत छोटे मोठे उद्योग व्यवसाय रसातळास गेले आहेत. त्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प होऊन बेरोजगारी देखील प्रचंड वाढली आहे .त्यातच पेट्रोल डीझेलची दरवाढ व प्रामुख्याने खाद्यतेलाचे भाव गगणाला भिडल्याने सर्वसामन्य जनतेचे महिन्याचे बजट पूर्णतः कोलमडले आहे.मात्र याकडे केंद्र सरकार डोळेझाक करत असल्याने देशाचे नेतृत्वच बदलण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करण्याची गरज आहे.
याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले,यांसह कॉंग्रेसचे राजेंद्र बरकडे ,विकास पवार ,दादासाहेब म्हेत्रे, नाना दाते ,गोरख मेमाणे किरण कुमठेकर ,बजरंग पवार शरद कदम कर्नलवाडीचे पप्पू कोंडे विकास कर्णवर पिंपरे गणेश थोपटे पिंगोरीचे राजू शिंदे तसेच मोहनराव ढोबळे दिपक कुमठेकर राजू लंबाते विनोद भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test