"आम्ही नूमवीय-२००३" सामाजिक संस्थेकडून
करंजे ग्रामपंचायतीस आरोग्य साहित्य वाटप .
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कोरोना काळात देशभरात सर्वत्रच ,पोलीस प्रशासन, आरोग्य सेवक ,आशा वर्कर,पत्रकार तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी आपली जीवाची पर्वा न करता गावमधील कोरोना चा आडवा घेत असलेल्या रुग्ण व त्यांच्या कुटूंबाना मदत करत असताना दिसत आहे..त्यांनीही आपली काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे या हेतूने
"आम्ही नूमवीय२००३" या सामाजिक संस्था संस्थेकडून रविवार दि १३ रोजी आरोग्य साहित्य भेट करंजे ग्रामपंचायत ला दिले तर सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामपंचयत कर्मचारी व गावातील इतर मान्यवर कोरोना काळात घरोघरी कोरोना विषयक काळजी व त्या विषयी जनजागृती करण्याचे काम ग्रामीण भागात करत असताना दिसत आहे.. त्यांनीही स्वतःची काळजी घ्यावी या हेतूने सामाजिक संस्था संस्थेकडून मदत म्हणून - स्व ३ आयआर गन्स , ३ ऑक्सिमिटर , १५ पीपीई किट्स ,१०० एन ९५ मास्क आरोग्य साहित्य संस्थेचे सदस्य
कौस्तुभ व्यंकंटेश दबडगे,आनंद घारमळकर,सुमित गुळवे,जतिन गुजराथी,रविराज बुरसे,रोहन पवार
विकास प्रभुणे,हर्षद होळकर,शेखर ढमाले यांनी
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रा. कार्यालयात स्वाधीन केले
या यावेळी उपस्थित सरपंच जया गायकवाड , उपसरपंच , कैलास गायकवाड सदस्य - बाळासाहेब शिंदे, भाऊसाहेब चंद्रशेखर काळभोर, ग्रा पं कर्मचारी अमोल गायकवाड,महसुल कर्मचारी तानाजी जाधव उपस्थित होते
तसेच ग्रामपंचायत करंजे चे "आम्ही नूमवीय २००३" या सामाजिक संस्थेचे सरपंच जया गायकवाड , उपसरपंच कैलास गायकवाड यांनी शाल व श्रीफळ देऊन आभार मानले.