Type Here to Get Search Results !

छत्र हरवलेल्या तिन्ही मुलींना मदतीचा हात : शिक्षण पूर्ण करण्याचे स्विकारले पालकत्व..अध्यक्ष सचिन घोटकुले.! LIVE पुणे बारामती

छत्र हरवलेल्या तिन्ही मुलींना मदतीचा हात : शिक्षण पूर्ण  करण्याचे स्विकारले पालकत्व..अध्यक्ष सचिन घोटकुले.! LIVE पुणे बारामती

बारामती प्रतिनिधी

आपल्या पवन मावळ मधील काले पवनानगर येथील एक निराधार महिला भगीनीचे पती दुर्दैवाने आज जगात नाहीत.त्या महिलेला तीन मुली आहेत की ज्या तिन्ही मुली अतिशय लहान आहेत.त्यातील सर्वात मोठी मुलगी ही सहावीला नंतरची चौथीला व शेवटची मुलगी ही दुसरीला आहे.महिला निराधार असल्याने त्या तिन्ही मुलींचा शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या समोर होता.
समाजकार्य करत असताना मी या समाजाचा देने लागतो या भावनेने या तिन्ही मुलींची दहावी पर्यंतची शिक्षणाची सर्व जबाबदारी मी स्वतः घेत, आमदार सुनीलआण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पै.सचिनभाऊ घोटकुले स्पोर्ट्स फाऊंडेशन च्या माध्यमातून ती जबाबदारी मी पार पाडणार आहे.कोणत्याच अडचणी शिवाय या तिन्ही मुलींचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल.
आज माझ्या पवन मावळ मधील प्रत्येक कुटुंबाची समस्या ही माझी वयक्तिक समस्या समजत सुख-दुःखात त्यांच्या सोबत उभे राहणे ही मी माझी जबाबदारी समजतो.आज यानिमित्ताने मी पवन मावळ मधील सर्व निराधार माता-भगिनींना सांगु इच्छितो की आपणांस याप्रकारच्या कोणत्याही समस्या असतील तर नक्की तुमचा एक भाऊ,एक मुलगा म्हणून हाक द्या, या हाकेला मी व माझे स्पोर्ट्स फौंडेशन,  आमदार सुनीलआण्णा शेळके तसेच ,माजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी हे "एक हात मदतीचा" नक्की देऊ.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test