20 जुलै रोजी जिल्हास्तरावर उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमलेन
पुणे दि.19: जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) अंतर्गत जिल्हास्तरावर उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमलेन (Tech Market Meet) आयोजित करावयाच्या सुचना प्राप्त झाले आहेत. तरी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सदर संमेलन हे ऑनलाईन मायक्रोसॉफ्ट टिम्स वर जिल्हास्तरावर दिनांक २०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करणेत आले आहे.
उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनात खरेदीदार संस्था, निविष्ठा उत्पादन व विक्रेते प्रतिनिधी, आडते, व्यापारी, निर्यातदार, प्रक्रीयादार, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनीधी, शेतकरी गटांचे प्रतिनीधी इ. पिकांच्या मुल्यसाखळीतील घटकांना आमंत्रित करून प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून एका घटकाची दुस-या घटकाकडुन असणारी अपेक्षा समजून घेणे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमानंतर शेतमाल उत्पादक व खरेदीदार यांच्या अपेक्षांनुसार जास्तीत जास्त सामंजस्य करार व्हावेत असा उद्देश आहे. तरी आपण वरील कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा यांनी केले आहे.
https://teams.microsoft.com/l/meetup-
join/19:meeting ZDlmYzUzYmQtOGQ2Ny00MDIILWIZZmQtMTIjNjFiNjU2N2U5 @thread.v2/0?co ntext={"TId":"cbf61734-188c-4bbc-9813 401944c270ef" "Old":"a211ebe7-5a49-4563-3217-4443fd2f27b0"}
अधिक माहितीसाठी संपर्क क्र. (प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे कार्यालय) ०२०-२५५३०४३१