Type Here to Get Search Results !

निरेतील गुंड गणेश रासकर हत्येप्रकरणी तीन आरोपी जेरबंद तर एक फरार.

निरेतील गुंड गणेश रासकर हत्येप्रकरणी तीन आरोपी जेरबंद तर एक फरार. 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक शुक्रवारी दि 16 रोजी संध्याकाळी नीरा या ठिकाणी पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुंड गणेश रासकर याचा डोक्यात गोळी मारून खून करण्यात आला सदरची घटना घडल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.  अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक माननीय मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक माननीय पद्माकर घनवट यांनी सदरची घटना गंभीर असल्याने तात्काळ घटनास्थळी भेट दिली. वरील सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला सदर गुन्ह्यांमध्ये गणेश रासकर याचे पूर्वीचे साथीदार गौरव जगन्नाथ लकडे वय 24 वर्ष राहणार मिरेवाडी तालुका फलटण व निखिल रवींद्र डावरे वय 24 राहणार पाडेगाव तालुका फलटण या दोघांनी त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले त्याच्या शोधासाठी वेगवेगळी दोन पथके रवाना करण्यात आली. सदर चा खून गणेश रासकर यांनी आरोपी गौरव लकडे याचे कोर्ट कामी घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून झालेला आहे अशी फिर्याद दाखल झाली. सदर गुन्ह्यातील आरोपी हे परागंदा झाले त्यांचा सतत 36 तास पोलिसांनी शोध घेतला आरोपी तरडगाव मिरेवाडी परिसरात असल्याची पोलिसांना काआस होता त्या ठिकाणी पोलिसांनी दबा धरून आरोपींच्या वर दबाव वाढवला त्यांच्या सर्व साथीदारांची कसून चौकशी केली त्याच वेळी आरोपी निखिल रवींद्र डावरे हा पहाटे तीन वाजता त्याच्या घरी आलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्याला तात्काळ त्याच्या घरातून जेजुरी पोलिसांनी अटक केली. परंतु त्या ठिकाणावरून गौरव लकडे पळून गेला. सदर गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना यातील मयत गणेश रासकर याने गणेश लक्ष्मण जाधव राहणार निरा याची गाडी नऊ ते दहा महिन्यापूर्वी जाळली होती. त्याचा राग गणेश लक्ष्मण जाधव याला होता. तसेच निखिल रवींद्र डावरे त्याच्या पत्नीसोबत नऊ महिन्यांपूर्वी आरोपी गणेश रासकर यांनी गैरवर्तन केले होते व गणेश रासकर स्वतःचे नीरा परिसरात  वर्चस्व राहावे म्हणून कायम गौरव लकडे याला दाबुन ठेवत होता व त्याच्या पत्नी सोबत त्याचे संबंध असल्याचा संशय घेत होता व गौरव लकडे यांनी त्याला वेळोवेळी कोर्ट कामासाठी पैसे दिले होते ते पैसेही तो दादागिरीच्या जोरावर परत देत नव्हता म्हणून गणेश रासकर जेलमध्ये असताना तो परत बाहेर आल्यानंतर त्याचा खून करण्याचा नियोजित कट यावरील सर्वांनी केला होता. हे सर्व वेगवेगळ्या कारणांनी गणेश रासकर पासून दुखावलेले होते. त्यानंतर गणेश रासकर जेलमध्ये असताना त्यांनी संकेत सुरेश कदम राहणार लोणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्याकडून पिस्टल व चार राऊंड खरेदी केले होते. असे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यात गणेश लक्ष्मण जाधव राहणार नीरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे यालासुद्धा अटक करण्यात आलेली आहे. तसेच या गुन्ह्यात संकेत सुरेश कदम राहणार लोणी तालुका खंडाळा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन जेजुरी पोलीस स्टेशनला वर्ग केले त्यांनीसुद्धा या गुन्ह्यात वापरलेले हत्यार आरोपींना दिले म्हणून त्याला सुद्धा या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. अशा रीतीने या गुन्ह्यांमध्ये अद्याप पर्यंत एकूण तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहे. या गुन्ह्याचा आणखीनही सखोल तपास सुरू आहे. या गुन्ह्यात आणखीन काही नावे निष्पन्न झाल्यास त्यांनाही अटक करण्यात येईल. यातील पाहिजे आरोपी गौरव जगन्नाथ लकडे याचा शोध सुरू आहे. यातील आरोपी यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली मोटरसायकल बाबत माहिती मिळालेली आहे. ती जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक माननीय मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक हे करत असून या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कुतवळ पोलीस हवलदार संदीप  करंडे संदीप मोकाशी विठ्ठल कदम पोलीस नाईक धर्म वीर खांडे पोलीस नाईक अक्षय यादव पोलीस शिपाई प्रवीण शेंडे. यांनी अटक केलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपास कामी पोलीस नाईक राजेंद्र भास्कर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड होळकर पोलीस शिपाई निलेश जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test