मलठण ग्रामपंचायत वर शिवसेना चे उपसरपंच विठ्ठल सोलनकर यांची बिनविरोध
दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील मलठण ग्रामपंचायत वर शिवसेनेचे विठ्ठल लक्ष्मण सोलनकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच हनुमंत कोपनर, बाजार समितीचे माजी सभापती माऊली चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब देवकाते, मावळते उपसरपंच अनिता देवकाते, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला सांगळे जनाबाई जाधव, निर्मला देवकाते सोसायटी मा चेअरमन बाळासाहेब नितीन धगाटे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
या ग्रामपंचायत मध्ये . अकरा सदस्य असून त्या पैकी 6 सदस्य शिवसेनेचे आहेत दौंड तालुक्यातील महत्वाच्या गावांपैकी मलठण ग्रामपंचायत ओळखली जाते ही निवड
पुणे जिल्हा शिवसेनेचे समन्वयक शरदचंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच विठ्ठल सोलनकर यांनी सांगितले.