Type Here to Get Search Results !

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बारामती नगरपरिषदेकडून बायोडायव्हरसिटी पार्कचा शुभारंभ

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बारामती नगरपरिषदेकडून बायोडायव्हरसिटी पार्कचा शुभारंभ

 
बारामती प्रतिनिधी

माझी वसुंधरा अभियान - 2  दिनांक 5 जून 2021 पासून सुरू करण्यात आले असून या अंतर्गत बारामती नगरपरिषदेने अभियानातील पंचतत्वांवर आधारित विविध घटकांवर काम सुरू केले आहे. एन्वायरणमेन्टल फोरम ऑफ इंडिया यांच्या संकल्पनेतून बारामती शहर व तालुक्याकरीता सुरू केलेल्या मिशन एक लाख वृक्षलागवड या उपक्रमाअंतर्गत बारामती शहरात 8000 वृक्ष लागवड या पावसाळ्यात करण्यात येणार आहे. बारामती शहरात या अभियानाचा सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मारूती शोरूम बायपास रोड येथे वृक्ष लागवड करून शुभारंभ करण्यात आला. शासकीय महाविद्यालय रोड, रूई जळोची बायपास रोड, रेल्वे रूळालगतचा रोड इत्यादी ठिकाणी 800 च्या आसपास वृक्ष लागवड झाली आहे. 8000 वृक्ष लागवडीच्या  उद्दीष्टापैकी उर्वरित वृक्ष लागवडीचे नियोजन नगरपरिषदेच्या उद्यान विभागामार्फत केले असून पावसाळा संपण्यापुर्वी हे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन उद्यान विभागामार्फत देण्यात आले आहे.

माझी वसुंधरा टप्पा - 2 अंतर्गत बारामती नगरपरिषदेचे आरोग्य सभापती सुरज सातव, सदस्य गणेश सोनवणे आणि उद्यान विभागप्रमुख यांच्या संकल्पनेतून बायोडायव्हरसिटी पार्क उभारण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. विजयनगर परिसरात देशी, आर्युवेदिक, औषधी गुणधर्म असलेल्या 147 वनस्पतींची लागवड करून बायोडायव्हरसिटी पार्क उभारण्यात आला आहे. यामध्ये गवतीचहा, बेडकीपाला, पानफुटी, ओवा, तुळस, कापूरतुळस, गुंजवेल, कांडवेल, अक्कलकाढा वनस्पती, पेपरमिंट इत्यादी वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. नागरिकांना देशी, आर्युवेदिक, औषधी वनस्पतींचे महत्व लक्षात यावे, जास्तीत जास्त देशी वनस्पतींचे संवर्धन व्हावे याकरीता नागरिकांनीदेखील या पार्क मधील वृक्षसंपदेचे रक्षण करण्यास हातभार लावावा असे, आवाहन आरोग्य सभापती सुरज सातव यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनराध्यक्ष अभिजीत जाधव, गटनेते सचिन सातव, बारामती नगरपरिषदेचे सदस्य डॉ. सुहासिनी सातव, जयसिंग देशमुख, गणेश सोनवणे, शारदा मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते रणजीत तावरे, डॉ. सुनिता शहा, डॉ. मेहता आदी मान्यवरांसह बारामती शहरातील नागरिक, बारामती नगरपरिषद उद्यान विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test