महत्वाची बातमी;पुरंदर तालुक्यातील कडेपठार मंदिर जेजुरी येथे होणारी गणपुजा उत्सव रद्द..
पुरंदर तालुक्यातील शनिवार दि .१० / ०७ / २०२१ रोजी कडेपठार मंदिर जेजुरी येथे गणपुजा उत्सव होणार आहे. दरवर्षी सदर गणपुजेस ४० ते ५० हजार भाविक देव दर्शनासाठी येत असतात. सदर उत्सवात भाविक श्री खंडोबा देवाला रात्री १२.०० वा. पर्यंत भंडारा वाहतात व तेथेच थांबुन छबीना संपले नंतर पहाटे मंदिरातील भंडारा घेवुन जाणेसाठी लोकांची मोठया प्रमाणावर गर्दी होत असते.
सध्या कोरोना आजाराचे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याने पुणे जिल्हयात लेवल ३ चे निबंध लागु करण्यात आले आहेत. शासकीय निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अनुषंगाने अदयाप सर्व देवस्थान / मंदिरे बंद ठेवण्यात आले असुन मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण पुणे यांचे कोविड प्रतिबंधात्मक आदेशान्वये सायंकाळी ५.०० वा. चे नंतर सकाळी ०५.०० वा. पर्यंत संचारबंदी लागु करण्यात आली आहे.
तरी दि . १०/०७/२०२१ रोजी श्री. कडेपठार मंदिर , जेजुरी येथे होणारे गणपुजा उत्सव रद्द करण्यात आला असुन कोणीही भाविकांनी सदर दिवशी श्री. कडेपठार मंदिर, जेजुरी येथे येवु नये याकरीता जेजुरी पोलीस स्टेशन कडुन कडक बंदोबस्त लावण्यात येणार असुन श्री. कडेपठार मंदिर गणपुजा उत्सवास रोडला येणारे दुचाकी / चारचाकी वाहने जेजुरी पोलीसांकडुन जप्त करण्यात येणार आहेत. तसेच मंदिराकडे येणारे भाविकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असुन भाविकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास भा.दं.वि.क १८८ प्रमाणे त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
तरी महाराष्ट्रातील समस्त नागरिकांना जेजुरी पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येते की, दि . १०/०७/२०२१ रोजीचा श्री. कडेपठार मंदिर , जेजुरी येथील गणपुजा उत्सव कोरोना आजाराचे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका अनुषंगाने प्रतिबंधक उपाय योजना कारणास्तव करण्यात आला असुन भाविकांनी महिन्याची वारी, नवीन लग्न झाले आहे हे कारण सांगून जेजुरीला देवदर्शनासाठी येवु नये. जे भाविक येतील त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल व त्यांची वाहने जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.