Type Here to Get Search Results !

कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्तउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन


उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष
अजित पवार यांच्याकडून कबड्डी दिनाच्या शुभेच्छा

मुंबई,  :- कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं आहे. क्रीडामहर्षींच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कबड्डी दिनाच्या त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचेही अध्यक्ष असून ते  आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, स्वर्गीय बुवा साळवींनी महाराष्ट्राच्या मातीतली रांगडी कबड्डी इथल्या गावागावात रुजवली. प्रचंड मेहनत घेऊन कबड्डीला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवून दिलं. कबड्डीच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी जीवनभर परिश्रम केले. ते कुशल क्रीडासंघटक होते. कबड्डी खेळाडूंचा प्रमुख आधारस्तंभ होते. ‘प्रो-कबड्डी’च्या माध्यमातून आज कबड्डीला मिळत असलेल्या वलय व सन्मानामागे, कबड्डीमहर्षीं व सहकाऱ्यांनी जीवनभर घेतलेले कष्ट, केलेला त्याग आहे, याचंही स्मरण यानिमित्ताने केलं पाहिजे. क्रीडामहर्षी बुवा साळवींची जयंती व कबड्डी दिनाचा कार्यक्रम बंद सभागृहाऐवजी कबड्डी स्पर्धांच्या आयोजनातून मैदानावरच साजरा उचित ठरलं असतं. कोरोनाचं संकट संपल्यावर, कबड्डीस्पर्धांच्या आयोजनातून तो भव्य स्वरुपात साजरा करु शकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. कबड्डी खेळाडू, कबड्डीरसिक, क्रीडासंघटक, क्रीडाकार्यकर्ते व हितचिंतकांना त्यांनी कबड्डीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test