Type Here to Get Search Results !

बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समीती सदस्यपदी निलेश केदारी

बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समीती सदस्यपदी निलेश केदारी 


मोरगांव  प्रतिनिधी

उद्योग , उर्जा , व कामगार विभाग  मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णय २०१५ नुसार  बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे . या समीतीच्या अध्यक्षपदी रवींद्र बाबुराव माने तर  सदस्यपदी श्री क्षेत्र मोरगावचे सरपंच निलेश हरीभाऊ  केदारी यांची निवड  करण्यात आली आहे .


 बारामती तालुका विद्युत वितरण समीतीपदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची नुकतीच निवड करण्यात आली आहे . यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या सुचनेनुसार  अध्यक्ष्यां व्यतीरिक्त ईतर  सहा अशासकीय  सदस्य निवडण्यात आले आहेत . अध्यक्षपदी खांडज येथील  ॲड . रवींद्र बाबुराव माने यांची निवड करण्यात आली आहे .  यामध्ये कार्यकारी अभीयंता , तहसिलदार , सभापती , नगराध्यक्ष आदी अकरा सदस्य आहेत .


 विज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मोरगावचे विद्यमान सरपंच निलेश केदारी यांची सदस्यपदी , तर उद्योगक्षेत्र ग्राहक मध्ये केलेल्या कार्याबद्दल संजय प्रभाकर दुधाळ , कृषी क्षेत्र ग्राहक मध्ये कार्याबद्दल  वैभव रघुनाथ बुरुंगले  , व्यवसाईक ग्राहक कार्याबद्दल विश्वास  मल्हारी मांढरे , घरगुती ग्राहक कार्याबद्दल विश्वास तानाजी  आटोळे , विज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल  सुनिल जयसिंग  खलाटे यांची निवड करण्यात आली आहे .

.......................................................

फोटो : निलेश केदारी 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test