वाघळवाडी-सोमेश्वरनगर विविध विकास कामांची रेलचेल ... भूमीपूजन कार्यक्रम संपन्न !
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर
गावातील असलेल्या समस्या गावातील तरुण पदाधिकारी हे सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन मिटत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तरुण कार्यकर्ते पुढाकार घेऊन काम करत असल्याने वाघळवाडी गाव विकासात पुढे आहे. त्यांच्या या कामास गती देण्यासाठी निधीची कमतरता भासून देणार नाही असे उदगार जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी काढले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नुकतेच विविध विकास कामाच्या भूमीपूजन कार्यक्रम सभापती प्रमोद काकडे आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप होते.प्रमुख पाहुण्या म्हणून नीता फरांदे उपस्थित होत्या.
गावाच्या विकास कामात तरुण पिढी सक्रिय सहभाग घेऊन काम करत असल्याने अनेक रस्ते,सभामंडप,भुमीगत गटरची कामे झाली.अजितदादांच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी निधींची कमतरता भासणार नाही. उपलब्ध झालेल्या निधीतून काम करून घेणे, प्रश्न सोडवणं अवघड असत त्या समस्या ग्रामस्थांच्या सहकार्याने सुटत असून युवक चांगले काम करत आहेत.त्यांना कायम सहकार्य राहील.असे मत संभाजी होळकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे,राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सतिश सकुंडे, राष्ट्रवादी कॉ पा नवी मुंबई चे उपाध्यक्ष विजय सावंत,समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, सोमेश्वरचे कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, युवा नेते गौतम काकडे,वाकीचे उपसरपंच ह.मा. जगताप,राज्य शिक्षक संघटनेचे सरचिटणीस केशव जाधव, राष्ट्रवादीच्या तालुका महिला सरचिटणीस सुचेता साळवे,खंडोबाचीवाडीचे धनंजय गडदरे,सदस्य पांडुरंग भोसले,चेतन गायकवाड,दत्तात्रय दडस,सुरेखा सावंत,शीला सावंत,लता शिंदे,श्रध्दा भुजबळ, ग्रामविकास अधिकारी सुभाष चौधर, ज्येष्ठ ग्रामस्थ गुलाबराव सावंत, कल्याण तुळसे, आनंदराव सावंत,बाळासो जाधव,रामचंद्र जाधव,राजेंद्र काशवेद,अंकुश सकुंडे,तानाजी सावंत,सोमनाथ पवार,सतिश सावंत,सुभाष शिंदे,विकास सावंत,प्रदिप मांगडे, रोहन कुलकर्णी,आबा पवार, शशिकांत लोखंडे,उदय किर्वे, योगेश सोळस्कर,कृष्णा कोळेकर,खामकर गुरुजी,शितोळे गुरुजी, ठेकेदार विजेंद्र शिंदे, किरण धुमाळ, आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड,युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे यांनी केले.तर राष्ट्रवादीचे शिक्षक सेलचे तालुका अध्यक्ष
अविनाश सावंत यांनी आभार मानले.
वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत होणाऱ्या ८० लाख रुपयांच्या रस्ते आणि भूमिगत गटर अश्या विविध विकास कामाचे भूमीपूजन कार्यक्रम पार पडला.या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती प्रमोद काकडे यांच्या निधीतून, ग्रामपंचायतीचा 14 आणि 15 वित्त आयोग, ग्राम निधी, व जि प निधीमधून गावठाण, मांगडेवस्ती,रेणुकानगर-हरणाईवस्ती,सावंतवस्ती, घारे खानावळ, सावतामाळी मंदिर या ठिकाणची विविध विकास कामे होणार आहेत.