पिंपळी येथे ग्रामीण जागरूकता कार्यक्रम संपन्न
बारामती प्रतिनिधी
पिंपळी ( ता.बारामती )याठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूज च्या रत्नाई कृषी महाविद्यालय तर्फे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागृकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील तसेच समन्वयक डॉक्टर डी.पी.कोरडकर,प्रा.आर.जी.नलावडे, प्रा.एस.एम.एकतपुरी,प्रा.एस.आर.आडत, प्रा.डी.एस.मिटकरी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिदूत अभय माने यांच्या वतीने शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अक्षय माने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पिके, फळे आंबा, डाळींब यांच्यावर पडणाऱ्या रोगाविषयी माहिती दिली व फळे व पिकांवर पडणाऱ्या रोगांवर उपाय योजना कशाप्रकारे करावे आणि फायदे-तोटे त्याचप्रमाणे अधिक भरगोस उत्पादन कसे मिळवावे याविषयी विस्तृतपणे माहिती दिली.
याप्रसंगी बारामती तालुका संजयगांधी निराधार योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, पिंपळी गावचे माजी सरपंच रमेशराव देवकाते, शेतकरी बाळासो बंडगर व रमेश दिनकर देवकाते यांचे हस्ते फळझाडांचे वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अनिकेत बंडगर, विकास बंडगर,
सौरभ देवकाते, नितीन पवार, आबासो देवकाते, सुयश देवकाते,संदिप देवकाते आदी शेतकरी उपस्थित होते.