कै.माणिकराव शेंडकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील बारामतीतील शेंडकरवाडी येथे सामजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर तानाजी शेंडकर यांचे वडिल कै.माणिकराव शेंडकर यांचे रविवार दि 4 रोजी असणारे प्रथम पुण्यस्मरण दिवशीचा अनावश्यक खर्च टाळत जिल्ह्यापरिषद शाळा व पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 येथे शोभेची व वड, पिंपळ ,चिंच अश्या विविध प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपण मा.उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन लि. शामकाका काकडे-देशमुख ,पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे-देशमुख तसेच बारामती पंचायत समिती सदस्या मेनका मगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले ,
कर्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर व जेष्ठ ग्रामस्थ यांनी वृक्षारोपण कार्यक्रमचे कौतुक करत सर्वानी आपले सुख- दुःख असणारे कार्यक्रम समाजहित जपत झाडे लावण्याबरोबर इतर कार्य करावे अशी आशा व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली ...उपस्थित युवकांनीही ती मान्य करत शेंडकर यांच्या सारखे समाजहित जोपासणारे अशे विविध उपक्रम आम्ही नक्की राबू असा विश्वास ही या प्रसंगी दिला.
तसेच ह ब प रामचंद्र राक्षे महाराज-होळ
यांचे सामजिक संदेश व कर्यक्रमाची शोभा वाढावी म्हणून रविवारी दि 4 रोजी किर्तन स्वरूप कर्यक्रम ठेवण्यात आला.
याप्रसंगी संग्रामभाऊ सोरटे (अध्यक्ष नवनाथ उधोग समूह), रमाकांत गायकवाड( नियंत्रक पुणे जिल्हा एस.टी.महामंडळ) आप्पासाहेब गायकवाड( मा.सदस्य पंचायत समिती बारामती).तसेच करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड, सोरटेवाडी सरपंच दत्तात्रय शेंडकर, राजकुमार शेंङकर (मा.अभियंता जलसंपदा विभाग),
कैलास मगर, अँडो.रूपचंद शेंङकर, अँडो.तानाजी शेंङकर,,सुरेश शेंङकर, शहाजी शेंङकर,नामदेव शेंङकर,
किरण शेंडकर, महेश शेंडकर, बाळासाहेब शेंडकर,सामाजिक कार्यकर्ते सुभाष शेंडकरधनंजय शेंडकर, श्रीकांत शेंडकर,रामचंद्र कामठे ,बुवासाहेब हुंबरे,पत्रकार संतोष शेंडकर, महेश जगताप, युवराज खोमणे, विनोद गोलांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शेंडकर व उपस्थितांचे आभार शिवाजी शेंडकर यांनी मानले.