बळीराजाचा बेंदूर हा सण दुसऱ्या वर्षी ही साधेपणात साजरा...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीबतालुक्यातील अनेक गावात बळीराज्याचा बंदुर हा असणारा गुरुवारी (ता.22) हा सण कोरोनोचे सावट असल्यामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.
शेतकरी बांधव हा सण मोठ्या उस्ताहात साजरा करतो.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीसंस्कृती हा देशाचा प्राण आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. कृषीसंस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी येतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यापैकीच एक आपल्या मातीतील
काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सण साजरा केला जातो. तर महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये याच सणाला ‘पोळा’ असे म्हटले जाते. तो श्रावण महिन्यातील अमावस्येला येतो.
शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना आंघोळ घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय घरगुती बैलजोडी नसेल तर घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते.
बैलांची खांदे मळणी वशींडापासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा. सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. बैलांची ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढली जाते.
कोरोनामुळे साधेपणाने सण साजरा
बारामती तील कांही भागत म्हणजे चौधरवाडी वाघळवाडी वाणेवाडी-मळशी आदी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरामध्ये काढण्यात येणाऱ्या बैलांच्या मिरवणूकीवर यंदा निर्बंध आल्याने शेतकरी बांधवांचा उत्साह कमी झाला होता.
... शहाजीआबा जगताप ...