अमोल मारुती भोसले (पोलीस नाईक) यांची करंजेपुल दुरक्षेत्र येथे नियुक्ती.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर अंतर्गत असणाऱ्या करंजेपुल पोलीस ठाण्यात अमोल मारुती भोसले यांची नियुक्ती या अगोदर लोणी काळभोर (ता हवेली) पोलीस ठाण्यामध्ये पाच वर्ष कार्यरत होते. पोलीस नाईक म्हणून आत्ता त्यांची वडगांव निंबाळकर अंतर्गत असणाऱ्या करंजेपुल पोलीस चौकी येथे नियुक्ती झाली असून वडगांव निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व करंजेपुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शेलार सर्व स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्या अंतर्गत उरुळी कांचन पोलीस दुरक्षेत्र कार्यरत असताना अनेक गुन्हेगारांच्या त्यांची तेथील अधिकारी समवेत चागल्याच मुसक्या अवल्या असून करंजेपुल हद्दीतील अशीच कामगिरी करण्याचा मानस असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केला.