Type Here to Get Search Results !

सोमेश्वर मंदिर परिसरात ऋषी गायकवाड मित्रपरिवार व गायकवाड कुटुंबियांच्या संकल्पनेतून होणार सुंदर बगीचा.

सोमेश्वर मंदिर परिसरात ऋषी गायकवाड मित्रपरिवार व गायकवाड कुटुंबियांच्या संकल्पनेतून  होणार सुंदर बगीचा..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

सोमेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराचा व परिसराच्या जिर्णोद्धाराचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मंदिर परिसरात आता भव्य बगीच्या ची उभारणी केली जाणार आहे.  या मुळे  मंदिराच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त व सोमेश्वर सहकारी साख़र कारखान्याचे माझी संचालक कै. दत्तात्रय दिनकर गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ या बगीच्या ची उभारणी केली जाणार आहे.  या बगीच्या मध्ये सोन चाफा, दुरंतो, गोल्डन सिप्रस इ. सारखी फुलांची व शोभिवंत २६०० रोपे लावली जाणार आहेत. ड्रीप सिस्टम द्वारे या बगीच्या साठी पाण्याची सोय केली जाणार आहे. या रोपांची योग्य ती निगा राखण्याची जबाबदारी सोमेश्वर मंदिर देवस्थान ने घेतली आहे. 


बगीच्या मुळे मंदिर परिसर प्रसन्न व हिरवागार होईल. ऋषी गायकवाड मित्रपरिवार व गायकवाड कुटुंबियांच्या संकल्पनेतून या बगीच्या ची उभारणी होत आहे.
या बग़ीच्याची उभारनी युवक स्वता: च्या श्रमदानातुन करनार आहेत.
या बग़ीच्या च्या भूमिपूजन प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे पुजारी,पदाधिकारी,ऋषि गायकवाड,अविराज गायकवाड,निशिराज गायकवाड,अमित गायकवाड,दिग्विजय मगर,दिनेश शेंडकर,संग्राम हुमे,प्रफुल लोणकर,सौरभ पवार,अक्षय गायकवाड,भूषण गायकवाड,प्रतीक गायकवाड,नवाज़ शेख़,पवन गायकवाड,सनी गायकवाड,अविष्कार शिंदे,शंभु गायकवाड,अभी खामकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test