ओबीसी आरक्षण राज्यात रद्द;बारामती येथे २९ जुलैला एल्गार मोर्चाच्या मेळाव्याचे नियोजना-जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत
मोरगाव येथे बैठकी नंतर ओबीसी कृत्री समाजाचे कार्यकर्ते आगामी आंदोलनाची भूमिका व्यक्त करताना
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे आज ओबीसी आरक्षण कृती समीतीची बैठक संपन्न झाली . यामध्ये 29 जुलै रोजी बारामती येथे होणाऱ्या एल्गार मोर्चाच्या मेळाव्याचे नियोजनासाठी तालुक्यात सर्वत्र घोंगडी बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरले. याबाबतची माहिती जिल्हा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांनी दिली .
आज मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वर मंगल कार्यालयात अखिल भारतीय समता परिषद व ओबीसी समाज कृती समाजाची बैठक संपन्न झाली . यावेळी पुणे जिल्हा समता परिषद जिल्हाध्यक्ष अनिल लडकत , जय मल्हार संघटनेचे महाराष्ट्र सचिव गणपत आबा देवकाते ,बापूराव सोनवलकर , मोरगावचे सरपंच निलेश केदारी , संपत टकले ,पांडुरंग गारडे , दत्ता लोणकर ,नाना नेवसे , सुनील ढोले आदी उपस्थित होते .
ओबीसी आरक्षण राज्यात रद्द झाले असल्याने समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे .या नाराजीचे रुपांतर एल्गार मोर्चामध्ये होणार आहे .आज झालेल्या बैठकीत राज्य सरकार व केंद्र सरकारने ईंपेरीयल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा , यांसह ओबीसीच्या विविध समस्याबाबत चर्चा झाली .तसेच बारामतीमध्ये होणाऱ्या मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत यांनी केले .
मोरगाव येथे बैठकी नंतर ओबीसी कृत्री समाजाचे कार्यकर्ते आगामी आंदोलनाची भूमिका व्यक्त करताना