सुपा रस्त्यावरील काळखैरेवाडी येथील टायरचे दुकान फोडून २७ हजारांचा माल पळवला
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव सुपा रस्त्यावरील काळखैरवाडी गावाच्या हद्दीतील शंभो टायर हे दुकान अज्ञान चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह २७ हजार २४० रुपयांचा माल लंपास केला. ही घटना काल रात्री घडली याबाबत संतोष चांगदेव भोंडवे वय-३४ वर्षं व्यवसाय-शेती /टायरचे दुकाण रा.राजबाग, काळखैरेवाडी ता.बारामती यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी अज्ञान्याता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये १२ हजार रुपयांचे इंडीका कारचे अल्ट्रा माईन कंपनीचे ४ टायर, ७७४० मोटार सायकलचे जे.के कंपनीचे ६ टायर, ४ हजार रुपयांचे एक इकव्हीजन कंपनीची २ डी.व्ही.आर.मशीन, २ हजार रुपयांचे टायरचे नट खोलण्याची मँक्स कंपनीची गण, तसेच १५०० हजार रोख रक्कम चोरट्याने पळविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपी याने फिर्यादी यांचे मोरगाव सुपा रोड लगत असलेले शंभो नावाचे टायर विक्रीचे दुकानाचे शटरचे कुलूप कशाने तरी उचकुटून त्यावाटे आत मध्ये प्रवेश करून वर नमुद वर्णनाचा व किंमतीचा माल घरफोडी चोरी करून नेला आहे .वगैरे म।।ची फिर्याद वरून दाखल गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट सो बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पो.ना.नगरे हे करीत आहेत.