पुरंदरच्या ग्रामीण भागात एसटीची चाके होणार गतिमान राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नांना यश
पुरंदर तालुका प्रतिनिधी
कोरोनाची महामारी त्यातच लॉकडाऊनमुळे एस.टी.च्या फेऱ्यांची गती कमालीची मंदावली होती .परंतु काही महिन्यांपुर्वी नियम शिथिल झाल्यावरही ग्रामीण भाग वगळता एसटीच्या बसेस केवळ लांब पल्यासाठी सुरु करण्यात आल्याने विशेषतः पुरंदरच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.अखेर अजित युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व अजिंक्य टेकवडे यांनी एसटी महामंडळाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुरंदरच्या ग्रामीण भागात आता एसटीची चाके गतिमान होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
यावेळी पुरंदरच्या वीर मांडकी राख नावळी कोळविहीरे आदी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाचे साधन नसल्याने त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता अजिंक्य टेकवडे यांनी सासवड आगारच्या व्यवस्थापिका मनिषा इनामके यांच्याशी संपर्क साधून निवेदन देत चर्चा देखील केली आणि ग्रामीण भागातील एसटी च्या फेऱ्या सुरु करण्यासाठी पाठपुरावा देखील केला .यावेळी सासवड आगाराने देखील टेकवडे यांच्या पाठपुराव्यास प्रतिसाद दर्शवत सासवड जेजुरी कोळविहीरे राख गुळुंचे नावळी नीरा मांडकी वीर सासवड या मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत .
यावेळी अतुल जगताप ,शैलेश रोमन, गणेश पवार ,मेघराज निगडे , गोरख मेमाणे ,विराज रनवरे, विशाल भोसले, सनी निगडे आदी मान्यवरांसह नागरिकांनी देखील अजिंक्य टेकवडे यांचे आभार मानले .