Type Here to Get Search Results !

वडगांव निंंबाळकर पोलीसांची कामगिरी ; खुनाचा प्रयत्नच्या दोन गुन्ह्यातील दोन आरोपींना जेलबंद

Top Post Ad

वडगांव निंंबाळकर पोलीसांची कामगिरी ; खुनाचा  प्रयत्नच्या दोन गुन्ह्यातील दोन आरोपींना जेलबंद
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

 बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मुरूम गावचे हद्दीत 'गाईच्या व्यवहारातील पैसे देण्याचे कारणावरून' तलवारीने गंभीर मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला होता, सदरबाबत वडगाव निंबाळकर पोस्टे गु. र. नं. 520/2020 भादवि 307,143, 147, 326  प्रमाणे दि. 15/11/2020 रोजी गुन्हा दाखल होता,सदर गुन्ह्यातील  9 आरोपी  या अगोदर अटक केले होते व  एक आरोपी शंकर तात्याबा बोडरे रा. पिंपळवाडी साखरवाडी ता. फलटण जि. सातारा हा गुन्हा घडल्यापासून फरार होता  तो साखरवाडी ता फलटण येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

तसेच मौजे पणदरे,गीतानगर येथे दिनांक 30/7/2021 रोजी 'खरकटे पाणी टाकल्याच्या कारणावरून'  इसम नामे कैलास हिरामण डोंबळे यांनी राजेंद्र कुंडलिक धायगुडे यांच्या मानेवर कुऱ्हाड मारून गंभीररीत्या जबर मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला होता,  सदरबाबत वडगाव निंबाळकर पो स्टे गु र नं 280/2021 ipc 307,504, 34  प्रमाणे गुन्हा दाखल होता, सदर गुन्ह्यातील आरोपी कैलास डोंबळे  हे गुन्हा घडलेपासून फरार होता,  गोपनीय माहिती व तांत्रिक माहिती  च्या आधारे सदर चा आरोपी हा इचलकरंजी  जि कोल्हापूर येथे असल्याचे समजले  त्या प्रमाणे इचलकरंजी येथे जाऊन आरोपी  कैलास हिरामण डोंबळे यांला ताब्यात घेऊन अटक केली आहे, 
          सदर ची कारवाई ही मा.डॉ अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सो बारामती  विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर सो यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव निंंबाळकर  सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे, करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस निरीक्षक योगेश शेलार, पोसई  कवितके, पो ना चौधरी, पोना खेडकर, पोना गोपाळ, पो.शि. साळुंखे, पो शि लोखंडे यांनी ही कामगीरी केली आहे.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.