Type Here to Get Search Results !

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांनाउपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली


काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
 
“काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानं दुर्बल, वंचित समाजबांधवांच्या विकासाला वाहून घेतलेलं अभ्यासू, मृदूभाषी, संवेदनशील नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. सभागृहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाचं योगदान दिलं. पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी प्रदीर्घ काळ तळमळीनं काम केलं. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ सहकारी नेतृत्वाचं निधन हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. मी शरद रणपिसे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद रणपिसे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test