Type Here to Get Search Results !

बारामतीतील पळशी येथील यवतजवळ अपघातात दोघेजण ठार तर एकजण गंभीररित्या जखमी

बारामतीतील पळशी येथील यवतजवळ अपघातात  दोघेजण ठार तर एकजण गंभीररित्या जखमी
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
पुणे सोलापूर महामार्गावर यवत गावाच्या हद्दीत महती कंपनीसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे.
  या अपघातात नाना अप्पा करे (वय 53), राधा बापू करे (वय 30) हे जागीच मृत्युमुखी पडले आहेत. तर दादा साहेबराव करे (वय 45) हे गंभीर जखमी झाले आहेत. वरील सर्वजण पळशी ता. बारामती येथील रहिवाशी आहेत.
  हे सर्वजण दुचाकीवरून सोलापूर दिशेला जात असताना हा अपघात झाला आहे.
  या घटनेची फिर्याद गेना नाना करे यांनी यवत पोलिसांत दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test