CRIME NEWS बेकायदेशीर क्रिकेट बेटींग अडड्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई
मिळालेल्या गोफणीय माहितीनुसार बेकायदेशीर क्रिकेट बेटींग अडड्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई. दि.१९.०९.२०२१ रोजी पासुन दुबई येथे सुरु असलेल्या IPL क्रिकेट मॅचेस सुरु झाल्या असुन सदर IPL क्रिकेट मॅचेसवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे ऑनलाईन बेटींग चालु असलेबाबत मा. पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांना गोपनीय माहीती प्राप्त झाल्याने त्यांनी सदर ऑनलाईन चालु असलेल्या बेकायदेशीर बेटींगच्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्यावरुन दि. २६.०९.२०२१ रोजी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १, श्रीमती प्रियंका नारनवरे, मा. पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा (प्रभारी अपर पोलीस आयुक्त गुन्हे) श्रीमती भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. क्रिकेट मॅचवर बेकायदेशीर चालणा-या बेटींगच्या ठिकाणाची गोपनीय माहीती प्राप्त केली असता समर्थ पोलीस ठाणे हद्दीत इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स समोरील त्रिमुर्ती सोसायटी येथे इसम नामे गणेश भिवराज भुतडा, वय-५० वर्षे, त्रिमुर्ती सोयायटी, रास्तापेठ, पुणे हा क्रिकेट मॅचवर बेकायदेशीरपणे ऑनलाईन बेटींग घेत असताना मिळुन आला. त्याचेजवळ ९२,६५,०००/- रु कि. चा माल
त्यामध्ये ९२,००,०००/- रु रोख रक्कम व ६५,०००/- रु किं. चे मोबाईल व नोटा मोजण्याची मशीन ई. मुद्देमाल मिळुन आला. त्यास मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द भा.दं.वि. कलम ४२०,४६५,४६८,४७१ तसेच जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ (अ), ५ सह भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) अन्वये समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच मार्केट यार्ड पोलीस ठाणे हद्दीत बी-५०३, हाईड पार्क, मार्केट यार्ड, पुणे येथे इसम नामे अशोक भवरलाल जैन,वय-४८,रा.सदर हा क्रिकेट मॅचवर ऑनलाईन जुगार घेत असताना मिळुन आला. त्याचेजवळ ५९,०००/- रु कि. चा माल त्यामध्ये ५१,७००/- रु रोख रक्कम व ७०००/- रु किं. चे ७ मोबाईल, लेटर पॅड व मोबाईल स्टॅन्ड ई. मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द भा.दं.वि. कलम ४२०,४६५,४६८,४७१ तसेच जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ (अ), ५ अन्वये
मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर दोन्ही गुन्ह्यातील नमुद आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त पुणे शहर,डॉ.रविंद्र शिसवे, मा.पोलीस उप आयुक्त,परिमंडळ-१,श्रीमती.प्रियंका नारनवरे, मा.पोलीस उप आयुक्त,आर्थिक गुन्हे शाखा,(प्रभारी अपर पोलीस आयुक्त गुन्हे),श्रीमती भाग्यश्री नवटके यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.



