Type Here to Get Search Results !

मोठी बातमी ; महाराष्ट्रातील शाळा 'या' तारखेपासून होणार सुरू

मोठी बातमी ; महाराष्ट्रातील शाळा 'या' तारखेपासून होणार सुरू
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे . आता , 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे . शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे . राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता . मात्र , त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता . 

     मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे . गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या . कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे . शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे . त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे . एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या . पण काही अडचणी आल्या . पण येत्या 4 तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत . त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत . आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे . कोरोना संपल्यात जमा आहे . पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील.आताच निर्णय झाला आहे . त्यामुळे कोणत्या वर्गापासून शाळा सुरु होणार हे निश्चित सांगता येणार नाही . सोशल मीडियावर अनेक पालक तसेच विद्यार्थ्यांनी शाळा सुरु कराव्यात अशी मागणी केली होती . 

    काही संघटनांनीदेखील मागणी केली होती . सर्व गोष्टींचा निर्णय घेऊनच आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे . अधिवेशनाच्या काळात जशी आपण काळजी घेतली होती , त्याच धर्तीवर शाळा सुरु करण्यासंदर्भात काळजी घेतली जाईल . कुठे रुग्णसंख्या वाढलीच तर आपण लगेच तपासणी करुन घेऊ , असं बच्चू कडू म्हणाले आहेत . शाळा सुरु करण्याचा निर्णय झालेला आहे . जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल , अशी माहिती आहे . कोणत्या वर्गांच्या शाळा सुरु होणार यासंदर्भात अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही . मात्र , गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी , पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे .

अशी असेल नियमावली 
( i ) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा . ( ii ) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे . याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे . याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद / आयुक्त , महानगरपालिका / मुख्याधिकारी , नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा . 
( iii ) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये . 
( iv ) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे . उदा . जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये , एका बाकावर एकच विद्यार्थी , दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर , एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी , सतत हात साबणाने धुणे , मास्कचा वापर , कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करुन घेणे , इ .

( v ) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत . शाळा सुरु करताना मुलांना टप्प्या - टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे . उदा . वर्गांना अदला - बदलीच्या दिवशी सकाळी - दुपारी , ठराविक महत्वाच्या ( core ) विषयांसाठी प्राधान्य इ . हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना ( SOP ) चे पालन करावे . 
संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी , किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test