Type Here to Get Search Results !

खळद येथे २ ऑक्टोबरला मोफत सुधारित सातबारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन

खळद येथे २ ऑक्टोबरला मोफत सुधारित सातबारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन
पुरंदर प्रतिनिधी:-पुरंदर तालुक्यातील खळद येथील माऊली गार्डन मंगल कार्यालयात  २ ऑक्टोबर  रोजी सकाळी १०. ३० वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत सुधारित सातबारा वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुरंदर तालुका प्रशासनाने दिली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत सुधारित सातबारा वाटपाचा शुभारंभ  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे, कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम  यांच्या हस्ते  होणार असून कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव , जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशु, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी, विजय देशमुख  सातबारा संगणकीय राज्य समन्वयक रामदास जगताप, उपस्थित राहणार आहेत अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
                   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test