Type Here to Get Search Results !

सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती साजरी.

सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती साजरी.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.
       विदया प्रतिष्ठान, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे डाॅ. एच. एस. पाटील (विभागप्रमुख, वनस्पतीशास्र विभाग), डाॅ. जगदीश सांगवीकर (पदव्युत्तर समन्वयक, संगणकशास्र विभाग), डाॅ.संजय कांबळे (पदव्युत्तर समन्वयक, सुक्ष्मजीवशास्र विभाग) या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्रतिमेचे पुजन करण्यात आले. 
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करताना बहुजनांच्या शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या या महान शिक्षणतज्ज्ञाने मांडलेली भूमिका आजही दिशादर्शक आहे  त्यांच्याकडुन युवकांनी प्रेरणा घ्यावी असे सांगितले .
यावेळी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test