Type Here to Get Search Results !

महिला कॉंग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी वैशालीताई पवार तर नीरा- कोळविहिरे गटाच्या अध्यक्षपदी अँँड.विजयजी भालेराव यांची निवड

महिला कॉंग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी वैशालीताई पवार तर नीरा- कोळविहिरे गटाच्या अध्यक्षपदी अँँड.विजयजी भालेराव यांची निवड
  
पुरंदर प्रतिनिधी सिकंदर नदाफ
पुरंदर तालुका महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदी वैशालीताई पवार तर नीरा कोळविहिरे जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्षपदी जेष्ठ विधीतज्ञ  अँँड विजयजी भालेराव  यांची निवड करण्यात आली आहे.
जेजुरी येथील कार्यक्रमात पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार व कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजयजी जगताप यांच्या हस्ते  त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण यांसह नंदुकाका जगताप  जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणाताई सोनवणे कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा सुनीता कोलते सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे , प्रा. सचिन दुर्गाडे तसेच गणेश जगताप माउली यादव सतीश शिंदे संभाजी काळाणे आदी मान्यवर  उपस्थित होते. दरम्यान  जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताशेठ झुरूंगे निरेचे उपसरपंच राजेश काकडे तसेच नाना दाते,अमोल भुजबळ डॉ. सुमित काकडे  किरण भुजबळ हनुमंत भुजबळ, बाळासाहेब भुजबळ , मदनशेठ भुजबळ बंजरंग पवार महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह. भ. प.अशोक महाराज पवार आदी मान्यवरांनी वैशालीताई पवार व जेष्ठ विधीतज्ञ अँँड विजयजी भालेराव यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test