सारथी पुणे मार्फत प्रायोजित UPSC प्रशिक्षण उपक्रमातील २१ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड
पुणे,सारथी संस्थेचे २१ विद्यार्थी UPSC परीक्षेत यशस्वी सारथी, पुणे संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांनाकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. UPSC मुलाखतीच्या तयारीकरिता विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ञांमार्फत झूम मिटिंग द्वारे मार्गदर्शन देण्यात आले व सारथी संस्थेत अभिरूप मुलाखतीचे नियोजन करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.
नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला.त्यात सारथी पुणे मार्फत प्रायोजित UPSC प्रशिक्षण उपक्रमातील २१ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली
आहे. विनायक नरवाडे यांचा गुणवत्ता यादीत ३७ वा क्रमांक आहे. यशस्वी २१ विद्यार्थ्यांमध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी,
कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळुन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील
आहे. सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर (भा.प्र.से.से.नि.) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून या देशाच्या विकासात आपला ठसा उमटावा अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (भा.प्र.से.) यांनी दिल्या आहेत. सारथी, पुणे मार्फत UPSC चे प्रशिक्षण
घेऊन यश मिळविलेल्या २१ विद्यार्थ्यांची रँक नंबर व नावे पुढीलप्रमाणे - (AIR ३७) विनायक कारभारी नरवाडे, (AIR १८२) गौरव रविंद्र साळुखे, (AIR १८३) प्रतिक अशोक धुमाळ, (AIR २३६) प्रथमेश अरविंद राजशिर्के, (AIR ३२५) आनंद अशोक पाटील, (AIR ३५२) सागर भारत मिसाळ, (AIR ३५३) सुरज भाऊसाहेब गुंजाळ, (AIR ३६१) अनिल रामदास मस्के, (AIR ३८३) अर्पिता अशोक ठुबे, (AIR ४०२) अमोल सुरेशराव मुरकुट, (AIR ४२६) अनिकेत अशोक फडतरे, (AIR ४३२) राकेश महादेव अकोलकर,(AIR ४५५) ओंकार मधुकर पवार, (AIR ४६६) नितीन गंगाधर पुके,
(AIR ४७६) प्रणव विनोद ठाकरे, (AIR ५१३) रणजीत मोहन यादव, (AIR ५६१) माधुरी भानुदास गरुड, (AIR ५७७) पूजा अशोक कदम, (AIR ६१४) हर्षल भगवान घोगरे , (AIR ६३३) रविराज हरिश्चंद्र वडक व (AIR ६४१) सायली अशोक गायकवाड.



